Shau Foundation

शाऊ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट

“माणसाची सेवा म्हणजेच ईश्वरसेवा”

शाऊ फाउंडेशन ही २०१६ साली स्थापन झालेली एक सेवाभावी स्वयंसेवी संस्था आहे, जी ग्रामीण भागातील गरीब, वृद्ध, महिला आणि मुलांसाठी समर्पितपणे कार्य करते. समाजातील दुर्बल घटकांना आधार देण्याचे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं असतं, पण वेळेच्या अभावामुळे हे शक्य होत नाही. शाऊ फाउंडेशन तुमच्यासाठी एक असा विश्वासार्ह पर्याय आहे, जिथे तुम्ही तुमची सेवा वृत्ती कृतीत उतरवू शकता आणि गरजू लोकांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवू शकता.


आमची प्रेरणा

प्रत्येक व्यक्ती महान होऊ शकतो, कारण प्रत्येकजण सेवा करू शकतो.
त्यासाठी पदवी लागते असं नाही… फक्त अंतःकरणात कृपा आणि करुणा असली पाहिजे.

मार्टिन लूथर किंग जूनियर

मी झोपलो आणि स्वप्न पाहिलं की जीवन म्हणजे आनंद आहे.
मी जागा झालो आणि पाहिलं की जीवन म्हणजे सेवा आहे.
मी कृती केली, आणि अनुभवाला की सेवा हाच खरा आनंद आहे.

रवींद्रनाथ टागोर

आपण करत असलेली सेवा ही समुद्रात एक थेंब आहे,
पण तो थेंब नसलातरी समुद्र कमी होईल.

मदर तेरेसा


Vision :

ग्रामीण भागातील गरजू, दुर्बल व वंचित लोकांना संपूर्ण आधार, संरक्षण आणि काळजी देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे.

Mission :

ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सेवा उपक्रमांद्वारे पुनर्वसन, संरक्षण व सशक्तीकरण करणे.

आमची कार्यक्षेत्रे:

  • कै. सरुबाई नाईकरे महिला आरोग्य शिबिरे

  • विविध वैद्यकीय तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिरे

  • वृद्धांसाठी निवासस्थाने उभारणे

  • अनाथ मुलांसाठी अनाथाश्रम स्थापन

  • शैक्षणिक सहाय्य

  • ग्रामीण भागातील पुनर्रचना उपक्रम

आमची कार्यपद्धती:

  • गरजूंना शाश्वत मदत देण्यासाठी विविध उपक्रम राबवणे

  • ग्रामीण मुलांमध्ये शिक्षण व कौशल्य विकासासाठी प्रेरणा देणे

  • सामाजिक कलंक दूर करण्यासाठी विविध मदत सेवा

  • खासगी आणि सार्वजनिक संस्थांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागवणे

  • सामाजिक कारणांसाठी सल्ला, संरक्षण व आर्थिक मदत देणे


शाऊ फाउंडेशन आज केवळ एक ट्रस्ट नसून ग्रामीण युवकांचे चळवळीचे रूप घेत आहे. तुमच्यासारख्या सहृदयी व्यक्तींच्या सहकार्यामुळेच आज आम्ही हा प्रवास पुढे नेत आहोत. चला, एकत्र येऊन ग्रामीण भारताच्या भविष्याचा उज्वल मार्ग घडवूया!