दिनांक १५/०५/२०२३ रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीविना शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने शाऊ फाउंडेशन तर्फे कु. वरद विनोद पाटील या विद्यार्थ्याची इंजीनियरिंगची पुर्ण शैक्षणिक फी चा चेक सुपूर्द करताना.
दिनांक १६/०५/२०२३ रोजी श्री जानुबाई देवी देवस्थान ट्रस्ट मंदिराचा चांदीचा गाभाऱ्याच्या कामासाठी शाऊ फाउंडेशन तर्फे ११ हजार रुपयांचा देणगीचा चेक ट्रस्टचे सदस्य श्री विश्वास दादा आहेर यांच्याकडे देताना.
दिनांक १७/०४/२०२३ रोजी ऍसिड अटॅक झालेल्या महिलांसाठी काम करणारी संस्था छाव फाउंडेशन यांना आर्थिक सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे १ लाख रुपयांच्या देणगीचा चेक श्री राकेशजी शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.
दिनांक १३/०५/२०२३ रोजी सामाजिक बांधिलकी व पोलीस बांधवांच्या कार्यात सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे सहकारनगर पोलिस स्टेशन येथे नवीन कॉम्प्युटर सेट श्री साळगावकर साहेब (PI) यांच्याकडे सुपूर्द करताना.
“शाऊ फाऊंडेशन” तर्फे महिला सक्षमीकरण व जागृती करण्याच्या उद्देशाने आपल्या भागातील सर्व तरुण महिला आणि माता-भगिनींसाठी “द केरला स्टोरी” हा चित्रपट दिनांक ११ मे २०२३ वार गुरुवार रोजी दुपारी १:३० वाजता सिटी प्राईड, सातारा रोड, पुणे येथे मोफत दाखवण्यात आला. “शाऊ फाऊंडेशन” च्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी म्हणून जागृती करण्याचा हा छोटासा प्रयत्न…!
दिनांक ९/११/२०२२ रोजी तळजाई पठार, सर्वे नंबर ७, धनकवडी, येथील दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ५१ हजार रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. श्री सुभाष मोहिते साहेब यांच्याकडे देताना.
दिनांक ०४/०३/२०२३ रोजी श्री निळकंठेश्वर धर्मदाय व शैक्षणिक ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे १ लाख रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे मॅनेजर सोमनाथ भाऊ गुंजाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
दिनांक ४ मे २०२० पासून लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेल्या शहरातील अनेक गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने शाऊ फाउंडेशन तर्फे त्या कुटुंबांना दरमहा राशन किटचे वाटप करण्यात आले.
दिनांक १०/१०/२०२२ रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे ५१ हजार रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष श्री माणिक (दादा) चव्हाण यांच्याकडे देताना.
दिनांक २७/१२/२०१८ रोजी मारुती मंदिर, धनकवडी येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी शाऊ फाउंडेशन तर्फे ५१ हजार रुपयांचा देणगीचा चेक ट्रस्टचे सदस्य श्री बाबुरावशेठ परदेशी यांच्याकडे देताना.
एप्रिल २०२० च्या लॉकडाऊन काळात सामजिक बांधिलकी जपत शाऊ फाउंडेशन तर्फे सुरक्षित अंतराचे नियम पाळून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
शैक्षणिक मदत उपक्रम
आमचा ट्रस्ट ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. विशेषतः जे विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि ज्यांना आर्थिक आधार नाही, अशा विद्यार्थ्यांना आम्ही आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावतो.
आमचे महत्त्वाचे उपक्रम:
अनाथ मुलांना शैक्षणिक मदत
ग्रामीण भागातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना सहाय्य
ग्रामीण शाळांना मदत
शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप
लेखन साहित्य व स्टेशनरीचे वाटप
२०१६ पासून आम्ही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क व वसतिगृह खर्चाची मदत करत आहोत. त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ही मदत नियमितपणे दिली जाते.
आमचा ट्रस्ट गावांमध्ये जाऊन पालकांशी संवाद साधतो, त्यांना आपल्या मुलांना शाळेत घालण्यासाठी प्रेरित करतो आणि प्रत्येक मुलाला औपचारिक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो.
शैक्षणिक साहित्य, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी मोफत वाटप करून आम्ही पालकांवरील आर्थिक भार कमी करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी अडथळा निर्माण होणार नाही.
गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उभं करण्याची ही आमची जबाबदारी.